...

सोरायसीस रूग्णांसाठी आहार व दिनचर्या

सोरायसीस या त्वचारोगात रोगप्रतिकारक शक्तीतील बिघाडामुळे त्वचा जास्त प्रमाणात तयार होते. जास्त प्रमाणात तयार झाल्यामुळे अतिरिक्त त्वचेचा थर साठून जखमा व खपल्या बनतात. प्रत्येक आजाराच्या स्वरूपानुसार शरीराची आहाराची गरज बदलते, सोरायसीस मध्ये त्वचा खूप प्रमाणात गळते, त्यामुळे सोरायसीस रूग्णांना प्रोटीन्स आणि क्षारांची त्याचप्रमाणे अ,ड,ब१२ जीवनसत्वांची कमतरता भासते, सोरायसीसमध्ये त्वचा कोरडी पडल्यामुळे पाण्याची गरज वाढते.

मानसीक ताणतणाव,अपुरी झोप, बैठी जीवनशैली,स्थुलता,व्यायामाचा अभाव,मद्यपान,धुम्रपान,जेवणाच्या अनियमित वेळा,या सर्व गोष्टी सोरायसीस वाढवतात.त्यामुळे योग्य उपचारासोबत आहार आणि राहणीमानातील बदल,तसेच ताणतणावांचे व्यवस्थापन,रोगप्रतिकारक शक्ती संतुलित ठेवून सोरायसीस नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात.

गेल्या ३५ वर्षात डॉ.आर.एस.सोनावणे यांनी २४००० पेक्षा जास्त सोरायसीस रूग्णांवर औषधोपचार केले आहेत. या सदरात त्यांच्या ३५ वर्षाच्या संशोधनावर आधारित, सोरायसीस नियंत्रणात ठेवण्यासाठी रूग्णांनी प्रकर्षाने पाळावयाच्या नियमांचे विश्लेषण केले आहे.

सोरायसीस रूग्णांसाठी दिनचर्या

  • सकाळी लवकर उठावे व कोवळ्या सूर्यप्रकाशात २० मिनिटे बसावे. कडक ऊन व अतिनील किरणे टाळावी.
  • योगा व ध्यान शरीर आणि मनाची लवचिकता वाढवतात, मन शांत व संतुलित झाल्यास शरीराचा समतोल साधला जातो व रोगप्रतिकारक शक्ती संतुलितरित्या काम करण्यास मदत होते.
  • नियमित व्यायाम केल्याने शरीराचे वजन नियंत्रित राहते.
  • ७ तासांची शांत झोप शरीराची झीज भरून काढते व शरीर ताजेतवाने करण्यास मदत करते.
  • झोपण्यापूर्वी १ तास मोबाईल वा लॅपटॉपशी संपर्क टाळावा.
  • झोपण्याची ठराविक वेळ नियमित पाळावी.

सोरायसीस रूग्णांसाठी आहार

  • जेवण्याच्या ठराविक वेळा नियमित पाळाव्या.
  • मद्यपान,धुम्रपान पूर्णपणे टाळावे.
  • वांगी, गवारी, चिंच, कैरी, लोणची, लाल मांस पूर्णपणे टाळावे.
  • हिरव्या पालेभाज्या,फळभाज्या,मोड आलेली कडधान्ये,सर्व प्रकारच्या डाळी मुबलक प्रमाणात खाव्या.
  • जवस,ऑलिव्ह ऑईल,आक्रोड,बदाम,काजु दररोजच्या आहारात समाविष्ट करावे.
  • काकडी,गाजर,ब्रोकोली कच्चे व मुबलक प्रमाणात खावे
  • खा-या पाण्यातील मासे खाणे टाळावे, गोड्या पाण्यातील मासे खावे.
  • दूध,ताजे गोड दही,ताक यांचा आहारात भरपूर वापर करावा.
  • दररोज २ ते ३ लिटर पाणी प्यावे.
  • घरून काम करत असल्यास आहार कसा घ्यावा
Book Appointment
Scroll to Top
Psoriasis Severity Calculator Seraphinite AcceleratorOptimized by Seraphinite Accelerator
Turns on site high speed to be attractive for people and search engines.