खरे तर उन्हाळा म्हणजे सुट्टी—प्रवास—-मौजमजा!!
अशावेळी सर्वांना बाहेर फिरायला जायचे असते, वेगवेगळे फॅशनेबल कपडे घालून, फिरायला गेलेल्या ठिकाणी स्वतःचे सेल्फिज काढून सोशल मिडीयावर पोस्ट करायचे असतात, पण सोरायसीसमुळे सगळा मजा किरकीरा होतो, असं वाटतं , ‘काय करू या सोरायसीसला??? किती दिवस लपवत राहायचं याला??? कधी जाणार हा आजार माझ्या आय़ुष्यातून निघून??? कधी मी मला हवे तसे कपडे बिनधास्तपणे घालू शकणार,??? खरेच माझे आयुष्य इतरांसारखे बिनधास्त होईल???’
नक्कीच!!! सोरियाट्रीटमध्ये उपचार घेणा-या कितीतरी सोरायसीस रूग्णांचे आयुष्य खूप पॉझिटिव्हली बदललय!!!
सोरायसीस हा आजार उन्हाळ्यामध्ये नैसर्गिकरित्या कमी राहतो, ऊष्ण हवामानामुळे त्वचेचा रूक्षपणा नैसर्गिकरित्या कमी होतो व सोरायसीसची लक्षणे कमी जाणवतात,हिच ती वेळ आहे जेव्हा तुम्ही तुमचे होमिओपॅथिक उपचार सुरू करू शकता.
आता तुम्ही विचाराल असे का?
तर होमिओपॅथिक उपचारामुळे आजार पहिल्यांदा थोडा वाढू शकतो व नंतर तो कमी होऊन बरा होतो. उन्हाळ्यात कमी असलेला सोरायसीस थोडाफार वाढला तरी त्याचा तितकासा त्रास होत नाही. होमिओपॅथिक उपचार उन्हाळ्यात सुरू केल्यास पुढे येणा-या थंडीत त्याचा चांगला परिणाम दिसुन तुमचा हिवाळा सुसह्य बनेल.
सोरायसीस हा आजार उन्हाळ्यामध्ये नैसर्गिकरित्या कमी राहतो असे असले तरीही सोरायसीसच्या त्वचेकडे उन्हाळ्यात दुर्लक्ष करून चालणार नाही ,सकाळचे कोवळे ऊन सोरायसीस बरा करायला मदत करते. पण ते फक्त १० मिनिटे घेणे आवश्यक आहे. सोरायसीस रूग्णानी दुपारी ११ ते५ चे प्रखर ऊन टाळायचे आहे.
उन्हाळ्यातील प्रखर सूर्यकिरणांमुळे सोरायसीसच्या त्वचेस जास्त इजा पोहोचू शकते, अतिनिल किरणे सोरायसीसच्या त्वचेस सनबर्न देऊ शकतात, यामुळे सोरायसीस वाढून पूर्ण शरीराची त्वचा सुजु शकतो, क्वचित तो इरिथ्रोडर्मिक प्रकारचा बनतो, त्वचेची सुज वाढल्यास खूप प्रमाणात त्वचा गळून शरीरातील प्रोटीन्स व पाणी कमी होते, रूग्णास हॉस्पीटलमध्ये भरती करावे लागू शकते. सोरायसीसची ऊन्हाळ्यात योग्य काळजी घेतल्यास आपण हे टाळू शकतो.
ऊन्हाळ्यात एस्.पी.एफ ३० व त्यापेक्षा जास्त असलेले सनस्क्रीन सोरायसीस रूग्णांनी ऊन्हात जाताना वापरावे. सनकोटचा वापरही अवश्य करावा. आंघोळीनंतर ३ मिनिटांच्या आत मॉईश्चराईझिंग लोशन संपूर्ण शरीरास लावावे. खूप तेलकट मॉईश्चराईझर व तेलकट सनस्क्रीनपेक्षा वॉटरबेस्ड मॉईश्चराईझर व सनस्क्रीन वापरणे ऊन्हाळ्यात त्वचेसाठी फायदेशीर ठरते. अतिउग्र वासाची सनस्क्रीन्स व मॉईश्चराईझर्स रूग्णांनी टाळावीत.
उन्हाळ्यात घाम खूप येत असल्याने पाणी पिण्याचे प्रमाण वाढवले पाहिजे.३ ते४ लिटर पाणी सोरायसीसच्या रूग्णांनी दररोज प्यावे. कलिंगड,खरबुज,आंबा ही फळे उन्हाळ्यात मुबलक मिळतात, ही सर्व फळे सोरायसीसच्या रूग्णांनी रूग्णांनी भरपूर खावी. जेवण्याच्या ठराविक वेळा नियमित पाळाव्या.मद्यपान,धुम्रपान पूर्णपणे टाळावे.वांगी, गवारी, चिंच, कैरी, लोणची, लाल मांस पूर्णपणे टाळावे.
हिरव्या पालेभाज्या,फळभाज्या,मोड आलेली कडधान्ये,सर्व प्रकारच्या डाळी मुबलक प्रमाणात खाव्या.जवस,ऑलिव्ह ऑईल,आक्रोड,बदाम,काजु दररोजच्या आहारात समाविष्ट करावे.काकडी,गाजर,ब्रोकोली कच्चे व मुबलक प्रमाणात खावे,खा-या पाण्यातील मासे खाणे टाळावे, गोड्या पाण्यातील मासे खावे.दूध,ताजे गोड दही,ताक यांचा आहारात भरपूर वापर करावा.