सोरियासीस पेशंट्सनी हिवाळयात घ्यायची काळजी – हिवाळ्यात सोरायसीसचा त्वचाविकार कोरडया व थंड हवेमुळे अधिक बळावतो. कोंड्याच्या रूपात खूप सारी त्वचा गळते.अशावेळी त्वचेची अधिक काळजी घेणे अत्यावश्यक असते.
Table of Contents
Toggleआला हिवाळा त्वचा सांभाळा
त्वचा हा आपल्या शरीराचा सर्वात मोठा अवयव आहे. ती मुख्य दोन थरांची बनलेली आहे.
१) बाह्यत्वचा – हीचे पाच थर असतात.
२) आंतरत्वचा – हीचे दोन थर असतात.
आंतरत्वचेमध्ये केसांची मुळे, तेल, घाम स्त्रवणा-या ग्रंथी, मज्जातंतू, रक्तवाहिन्यांचे जाळे असते.
हिवाळ्यातील थंड व कोरड्या हवामानामुळे त्वचा रूक्ष बनते व त्वचा फाटू लागते. हात,पाय, चेहरा, ओठ कोरडे पडून त्यांना भेगा पडतात, त्यातून रक्त येते, सोरायसीसच्या त्वचेमध्ये आधीच कोरडी असलेली त्वचा अधिक कोरडी बनते. त्यावर त्वचेचे कोरडे जाड थर बनत जातात, व खूप प्रमाणात कोंडा तयार होतो.
सोरियासीस पेशंट्सनी हिवाळयात घ्यायची काळजी
- सर्वप्रथम हिवाळ्यात रूग्णांनी आपले औषधोपचार नियमित ठेवावेत,त्यात खंड पडू देऊ नये.
- त्वचा धुण्यासाठी जास्त थंड व जास्त गरम पाणी वापरू नये.या दोन्ही प्रकारात त्वचेचा कोरडेपणा अधिक वाढतो.
- त्वचा धुण्यासाठी कोमट पाणी वापरावे. रोज दोन वेळा आंघोळ करावी. अंघोळीच्या पाण्यात तेलाचे दोन-तीन थेंब मिसळयास त्वचा कोरडी होत नाही.
- सौम्य फेसवॉश, सौम्य शाम्पू व सौम्य साबण त्वचेसाठी वापरावा. तीव्र रासायनिक द्रव्ये असलेले शाम्पू,फेसवॉश, साबण,त्वचेचा कोरडेपणा वाढवतात.
- डाळीचेपीठ, मुलतानी माती, चंदंन या सर्वामुळे त्वचा अति कोरडी होते. यामुळे हिवाळ्यात यांचा वापर करू नये.
- चेहरा स्वच्छ करयासाठी स्क्रबचा वापर करू नये.
- हवेमध्ये बाष्प मिसळावे.
- त्वचा कोरडी पडू नये म्हणून भरपूर मॉईश्चराईझर वापरावे.
- नैसर्गिक मॉईश्चराईझर म्हणून साजूक तूप, तिळाचे तेल, कोकम तेल,खोबरेल तेल वापरल्यास याचा चांगला फायदा होतो.
- सोरायसीसच्या रूग्णांनी सकाळच्या कोवळ्या ऊन्हात २० मिनिटे बसावे. हे ऊन सोरायसीसच्या रूग्णांच्या जखमा भरून येण्यास मदत करते.
- पण जर हे रूग्ण कडक उन्हात वावरले तर अल्ट्राव्हायोलेट किरणांनी त्वचेवर जखमा होऊन सोरायसीस वाढू शकतो.
- बाहेर जाताना चेहरा, हात व पायही झाकले जातील, यासाठी काळजी घ्यावी.
- सोरायसीसच्या रूग्णांनी खाजविणे टाळणे गरजेचे आहे..अणुकुचीदार दात असलेले कंगवे,नखे यांनी खाजविण्यामुळे नव्या जखमा होऊन तिथे सोरायसीस वाढतो. खाज आल्यास तो भाग घट्ट दाबून धरावा.
- सोरायसीसच्या रूग्णांनी मऊ,सैलसर,सुती कपडे वापरावेत, या कपडयावर लोकरी कपडे घालावेत. त्वचेला थेट लोकरीचा स्पर्श टाळावा.
सोरायसीसच्या रूग्णांनी त्वचेच्या काळजीसाठी खालील घटकांचा आहारात समावेश करावा
व्हिटॅमिन एः पपई, गाजर, पालक, दूध,अंडी,फळे,पालेभाज्या
व्हिटॅमिन बीः शेंगदाणे, बदाम,पीच,वॉलनट,दही,ताक,ब्रोकोली
प्रोटिनः दूध, पालेभाज्या, गोड्या पाण्यातील मासे,मोड आलेली कडधान्ये,डाळी
सोरायसीसच्या रूग्णांनी त्वचेच्या काळजीसाठी खालील घटक आहारातून वगळावेत
वांगी, गवारी, कैरी, चिंच, टोमॅटो, बटाटे,
मटण, कोळंबी, खेकडे,
पिझ्झा, बर्गर, केक, चॉकलेट्स,
अल्कोहोल, तंबाखू, सिगारेट.