सर्वात महत्वाचा प्रश्न हा आहे कि सोरायसिस हा आजार औषधे न घेता कंट्रोल मध्ये ठेवता येतो का? (How to control psoriasis without medicine in Marathi?) आणि जर येत असेल तर मग कसा? या प्रश्नांची उत्तर शोधायची असेल तर सोरायसिस आजाराच्या मुळशी जाने आपल्याला गरजेचे आहे.
सोरायसिस हा त्वचेचा आजार आहे. त्वचारोग असला तरी याचे कारण फक्त त्वचा नसून मूळ कारण हे प्रतिकार शक्ती मध्ये झालेले बदल आहेत. याच बदलांचा परिणाम हा त्वचेवर होत असतो. हे समजून घेताना अनुवांशिकतादेखील आपण लक्षात घ्यायला हवी. मग आपण आपल्या परिवारात कोणाला तरी सोरायसिस आहे मग आपल्याला पण होईल का? या भीती मध्ये असला तर थांबा. तुमचा आहार आणि जीवनशैलीत चुका नसतील आणि ती योग्य असेल तर सोरायसिस हा आजार तुम्हाला होणार नाही. मात्र चुकांमुळे अनुवांशिक असलेला सोरायसिस हा आजार समोर येऊ शकतो.
औषध न घेता सोरायसिस कंट्रोल होऊ शकतो का? Is it possible to control Psoriasis without Medicines in Marathi?
तर याच उत्तर होय असे आहे. मात्र यावर काही प्रमाणात मर्यादा आहेत. तुम्हाला जर सोरायसिस काही थोड्या कालावधी पूर्वी झालेला असेल तर त्याची तीव्रता हि सौम्य असू शकते. आणि याच कालावधी मध्ये कोणत्याही औषधांचा वापर न करता फक्त आहारात आणि जीवन शैलीत काही बदल करून तुम्ही सोरायसिस वर नियंत्रण ठेवू शकता.
सोरायसिस वरील घरगुती उपाय – Home Remedies for Psoriasis
सोरायसिस या आजारची घरगुती उपायांनी तीव्रता कमी होऊ शकते. जेव्हा घरगुती काही उपाय कराल आणि औषधे आणि उपचार घेत असाल तर हे उपचार देखील अधिकाधिक उपयुक्त ठरू शकतात. तुम्हाला जर औषधांचा कार्यकाळ कमी करायचा असेल तर घरगुती हे उपाय करणे अगदी गरजेचे आहे.
ताणतणाव नियंत्रित ठेवणे
सोरायसिस हा आजार तुमच्या मानसिक स्थितीवर देखील अवलंबून आहे. त्यामुळे तन तणाव जर वाढत असतील तर सोरायसिस हा आजार देखील वाढतो. त्यामुळे तुम्ही जर मानसिक स्थिती कंट्रोल मध्ये ठेवली तर तुमचा सोरायसिस देखील नियंत्रणात राहू शकतो.
मोईश्चरायझर वापरणे
सोरायसिस मध्ये तुमची त्वचा हि अनेकदा कोरडी पडत असते आणि कोरड्या त्वचेवर खाज लवकर येते. त्यामुळे त्वचेवर मोईश्चरायझर लावून तुम्ही त्या त्वचेची काळजी घेऊ शकता. यासाठी तुम्हाला अंघोळ झाल्यानंतर 3 मिनिटांच्या आत मोईश्चरायझर लावलं तर त्वचा कमी कोरडी पडेल आणि तुम्हाला खाज येणार नाही.
अधिक माहिती वाचा
भरपूर पाणी पिणे
त्वचेवर बाहेरून आपण उपाय केले आहेत मात्र आता आतून देखील तुमची त्वचा कोरडी पडू द्यायची नसेल तर पाण्याचे जास्तीत जास्त सेवन करणे गरजेचे आहे.
घर बसल्या सोरायसिस आजारावर उपाय? | Psoriasis Treatment at Home in marathi
ज्या पदार्थांमध्ये क्षार आहेत ते आहार घेणे आवश्यक असते. कारण क्षार आणि ग्लुकोज या अशा गोष्टी आहेत ज्या आपल्या आहारतील द्रव्य आणि योग्य घटक शरीरात घेण्यासाठी मदत करतात. यामध्ये पालेभाज्या, सूप, नारळ पाणी, कडधान्य, पेज घ्यायला हवे. हळदीचे सेवन करणे गरजेचे आहे. ज्या फळांमध्ये anti oxidents आहेत ती फळ खाणे योग्य आहे. गाजर खाल्ल्यानंतर तुम्हाला अ जीवनसत्व मिळते. त्याचा देखील फायदा होतो.
सोरायसिस मध्ये त्वचा गळण्याचे प्रमाण देखील अधिक असते. त्यामुळे तुम्हाला अशा काळात प्रोटीन जास्तीत जास्त गरजेचे असते. शाकाहारी असाल तर पनीर, दुध आणि दही हे पदार्थ आणि मांसाहारी असाल तर चिकन, अंडी आणि मासे खाऊ शकता. मात्र रेड मिट म्हणजेच मटन, बीफ या गोष्टींचे सेवन टाळायला हवे.
जंक फूड आणि डबाबंद पदार्थ ज्यामध्ये ग्लुटीन असेल त्यांचे सेवन टाळावे. धुम्रपान आणि मद्यपान करत असाल तर ते टाळावे. कारण याने तुमचा सोरायसिस हा वाढत जातो.
7 ते 8 तसा शांत झोप
फक्त सोरायसिस नव्हे तर इतर हि आजारांवर नियंत्रण ठेवायचे असेल तर त्यासाठी झोप घेणे अगदी महत्वाचे आहे. झोप व्यवस्थित असेल तर मानसिक शांतता राहते, ताणताणाव कमी होतो आणि शरीराला देखील योग्य आराम मिळतो.
सूर्यप्रकाश घ्यावा
दररोज कमीत कमी 15 मिनिटांसाठी तुमची त्वचा हि सूर्य प्रकाशाच्या संपर्कात यायला हवी. याचा फायदा हा विटामिन डी आणि कॅल्शियम मिळविण्यासाठी होतो. जेव्हा शरीरात ड जीवनसत्व आणि कॅल्शियम असते तेव्हा सोरायसिस नियंत्रित ठेवण्यासाठी त्याचा फायदा नक्की होतो.
सोरायसिस आजारावर नियंत्रण करण्यासाठी तुम्ही या सर्व गोष्टीची अंमलबजावणी करू शकतात. इतकंच नव्हे तर तुमचा सोरायसिस हा कोणत्याही स्टेजचा असेल तरी देखील औषधांची परिणामकारकता या स्टेप फोलो केल्यानंतर वाढेल.