...

कोरोना आणि सोरायसीस

सोरायसीस रूग्णांशी, डॉ.आर.एस.सोनावणे (होमिओपॅथिक सोरायसीस स्पेशालिस्ट) यांचे कोविड-१९ लसीकरणाविषयी हितगुज

कोविड-१९ महामारीने सर्व जगाला हादरवून सोडले आहे.

कोविड-१९ ने गेल्या वर्षी अनेकांचा बळी घेतला,यात मधुमेह व उच्चरक्तदाब,किडनी,फुप्फुसाचे आजार असणा-या अनेक रूग्णांचा कोविड इन्फेक्शनमुळे मृत्यू झाला.पण अकल्पनीय परिणाम दाखवत कोविडने हे आजार नसणा-या तरूणाईला ही सोडले नाही.खूप निरोगी तरूण कोविडमुळे मृत्यु पावले. कोविडशी लढा देताना कित्येक डॉक्टर्स मृत्यु पावले.होमिओपॅथिक क्षेत्रातील काही नामांकित डॉक्टर्सना कोरोनामुळे प्राण गमवावा लागला.

या विषाणूजन्य रोगावर कोणताही ठोस ईलाज नाही त्यामुळे तो होऊ न देणे हाच एक उपाय आहे. मागीलवर्षी कोरोनाविरूद्धच्या लढ्यात निःशस्त्र असलेल्या मानवप्राण्यास यावर्षी मात्र स्वतःच्या बचावासाठी एक हुकमी शस्त्र सापडलंय– ते म्हणजे कोरोनाविरूद्धच्या लसीचे!

जसे लसीकरण होऊ लागले तसे अनेकांना हा प्रश्न पडतोय की लसीकरण घ्यावे की नाही? काही लोकांचे अल्टरनेटिव्ह थेरपी वर खूप प्रेम असते.काही लोकांना मॉडर्न मेडीसिनची, त्यांच्या उपचारांची भिती असते.काहींचा अतिआत्मविश्वास असतो, त्यांना वाटते लस घ्यायची काय गरज आहे? लसीकरणाविषयी उलटसुलट माहिती फॉरवर्डस द्वारे पसरवून जनमानसात लसीकरणाविषयी संभ्रम निर्माण करण्याचे काम व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी करत आहे. पण या सर्व लोकांना हे कळत नाही की कोविड संसर्गाच्या लक्षणांविषयी अंदाज वर्तवता येत नाही. काही रूग्णांमध्ये संसर्ग खूप लक्षणे निर्माण करत नाही,तर काही रूग्ण गंभीर आजारी होऊन मृत्यू पावतात.

हा हाहाःकार पाहता कोरोनास अटकाव करण्यासाठी कोरोना लसीकरणास सर्वानी अंगीकारले पाहिजे. कोरोना लसीकरण घेणे हे आपले कर्तव्य आहे. हा राष्ट्रीय कार्यक्रम असून हे लसीकरण घेऊन आपण देशहिताचे काम करत आहोत. कोरोनाविरूद्धच्या लढ्यात लसीकरण करून घेणारा प्रत्येक माणूस कोरोना योद्धा गणला जाऊ शकतो.

कारण तो स्वतःचे संरक्षण करून पर्यायाने इतरांना होणारा संसर्ग रोखू शकतो!

सोरायसीस असलेल्या ब-याच रूग्णांना प्रश्न पडतो की मला सोरायसीस आहे मी लस घ्यावी का? लसीने दुष्परिणाम होतील काय़?

एक होमिओपॅथिक सोरायसीस स्पेशालिस्ट या नात्याने मी, सोरायसीस असलेल्या माझ्या सर्व रूग्णांना सांगू इच्छितो की तुम्ही लस अवश्य घ्या, सोरायसीस हा रोगप्रतिकारकशक्ती संबधी आजार आहे तरीही जे पेशंट्स त्यासाठी होमिओपॅथिक उपचार घेत आहेत असे सर्व रूग्ण अवश्य लस घेऊ शकतात.लसीचे दुष्परिणाम नाहीत, लस घेतल्याने एखाद्या दिवसाचा होणारा त्रास हे तुमच्या सजग रोगप्रतिकारक शक्तीचे लक्षण असून तुमच्या शरीराने तो लसीला दिलेला प्रतिसाद आहे त्याविषयी भिती बाळगण्याचे कारण नाही. या व्यतिरिक्त जे काही तथाकथित दुष्परिणाम आहेत त्यांचे निवारण करण्यासाठी खूप होमिओपॅथिक औषधे आहेत, ती तुम्ही होमिओपॅथिक डॉक्टरांच्या सल्ल्याने घेऊ शकता.

होमिओपॅथिक उपचारा व्यतिरिक्त सोरायसीस साठी प्रगत वैद्यकिय शास्त्राचे उपचार घेत असलेल्या रूग्णांनी त्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने लस घ्यावी.लस घेण्या अगोदर काही दिवसासाठी त्यांना त्यांचे उपचार बंद करावे लागू शकतात. याबाबत डॉक्टरांचा सल्ला आवश्यक राहिल.

Book Appointment
Scroll to Top
Psoriasis Severity Calculator Seraphinite AcceleratorOptimized by Seraphinite Accelerator
Turns on site high speed to be attractive for people and search engines.