...

आरोग्याची पुर्नस्थापना म्हणजे रोग व औषधांपासून मुक्ती

साधारणतः आरोग्य म्हणजे शरीर व मनाची सामान्य अवस्था ज्यामध्ये शरीरातील सर्व क्रिया सुरळीत सुरू असतात व कोणत्याही रोगाची लक्षणे नसतात असा प्रचलित समज आहे. पण आरोग्यावस्था याचा अर्थ केवळ रोगांची अनुपस्थिती नव्हे. क्षणो क्षणी आपले शरीर हजारो विषाणू व जिवाणू पासुन आपले संरक्षण करत असते. व आपणांस आजार होऊ देत नाही. पण सामान्यतः सुदृढ आरोग्यावस्थेत आपणांस याची जाणीव नसते. जखम दुरूस्त होण्याची प्रक्रिया, रक्त गोठण्याची प्रक्रिया, शरीरात क्षणोक्षणी तयार होणारी रासायनिक प्रदूषणाचे नियंत्रण वगैरे हजारो प्रक्रिया आपणांस जाणवत नाहीत पण सुरू असतात म्हणजे आपले संपूर्ण आरोग्य. पण ज्यावेळेस आपली आरोग्यशक्ती म्हणजे रोग प्रतिकारशक्ती जेव्हा कमजोर होते तेव्हा रोग होतात. तेव्हा रोगांचा लक्षणपरत्वे उपचार म्हणजे तात्पुरती मलमपट्टी. पण रोगप्रतिकार शक्ती व आरोग्यशक्ती पूर्ववत पुर्नस्थापित करणारे वैद्यक शास्त्र हे आदर्श वैद्यक शास्त्र असते. होमिओपॅथिक वैद्यक शास्त्र हे रोग व रोगाची लक्षणे नाहीशी करणे यावर केंद्रीत नाही तर आरोग्य शक्ती व प्रतिकारशक्तींच्या रोगापुर्वीच्या अवस्थेत पुर्नस्थापन करण्यावर केंद्रीत आहे.
त्यामुळे होमिओपॅथी औषधांनी रोग व औषधी दोन्हींपासून मुक्ती मिळते हिच होमिओपॅथीची शक्ती. हिच संपूर्ण आरोग्यशक्ती.

Book Appointment
Scroll to Top
Psoriasis Severity Calculator Seraphinite AcceleratorOptimized by Seraphinite Accelerator
Turns on site high speed to be attractive for people and search engines.